नमस्कार,माझ्या मातंग बांधवांनो मी आपणाला मातंग समाजाच्या समस्या, प्रश्न, आणि इतर सामाजिक विषय या बद्दल बोलत आहे, आपला मातंग समाज महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या टक्केवारी मध्ये 60 टक्के समाज असून तोही अशिक्षित आहे, ग्रामीण भागात तर मातंग समाजाचे शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे अनेक मातंग परिवारांना तर आरक्षण विषयी खूपशी माहिती नाही आपल्याला आरक्षणाचा लाभ कसा घ्यायचा याचीही माहिती नाही, हक्क अधिकार हे तर लांबच आहेत याचे मुख्य कारण म्हणजे शिक्षण तेही उच्च शिक्षण याची कमतरता आहे, मातंग तरुणांनो फक्त शिक्षण नाही तर प्रत्येक क्षेत्रातील उच्च शिक्षण घेण्यासाठी आपली मुले मुली यांना सक्ती करा तरच आपली प्रगती होणार आहे आपली प्रगती म्हणजेच आपल्या समाजाचा विकास प्राधान्याने होणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज हा असंघटित आहे याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या समाज तीन भागात विभागला गेला आहे, एक म्हणजे आपल्या परंपरांना जपणारा कट्टर जातीशी इमान राखणारा आणि प्रामाणिक असा गट आहे दुसरा म्हणजे आपल्याच जातीतील शिक्षित लोक की त्यांचा बौद्धिक व भौतिक विकास झालेला आहे म्हणजेच त्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक विकास झालेला आहे आणि हे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना व त्यांच्या विचारांना मानणारा गट आहे आणि तिसरा गट म्हणजे आपला स्वतःचा शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती बरोबरच वैचारिक आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रभाव असणारा तसेच डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारून बौद्ध धम्माकडे वळलेला असा एक समूह आहे की त्याचे समाज भान जागृत आहे, तेव्हा बांधवांनो असा आपला समाज वरील तीन समूहामध्ये विभागला गेल्यामुळे आपण असंघटित आहोत. आपले संघटन जर मजबूत करायचे असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांती गुरु लहुजी वस्ताद, डाँ. अण्णाभाऊ साठे यांचे विचार घेऊन पुढे आले पाहिजे व आपला एक दबाव गट समूह तयार केला पाहिजे यासाठी मी आपणाला आवाहन करतो की आज आपण पाहतो सोशल मीडियावर जी आरक्षण विषयक चर्चा वादविवाद चालू आहे त्यामध्ये आपल्या समाजाला अ ब क ड उपवर्गीकरणानुसार आरक्षण मिळावे यासाठी ची मागणी आहे आपल्या मातंग समाजाची ही मागणी आहे ती रास्तच आहे, कारण मातंग समाजातील शिक्षणाचे प्रमाण खूप कमी असल्याने रोजगार, व्यवसाय या लाभासाठी असणाऱ्या आरक्षणापासून मातंग समाज हा वंचित राहिला आहे अनुसूचित जातीतील काही प्रमुख घटकच आरक्षणाचा अनावश्यक फायदा घेत आहे तसेच अनुसूचित जातीमधील वर्दळीमुळे एक जात दुसऱ्या जातीवर वर्चस्व गाजवू पाहत आहेत त्यामुळे सामाजिक न्यायासाठी समाजाला स्वतंत्र न्याय आरक्षण मिळावे असे मलाही वाटते याचे दुसरे कारण म्हणजे राजकीय व सामाजिक भाग जर आपण पाहिला तर मातंग समाजाला अनुसूचित जातीतील दुसऱ्या क्रमांकाची जात असून सुद्धा कशातही प्रतिनिधित्व मिळू दिले जात नाही, सतत भेदभाव केलेला आहे, तेव्हा मातंग बांधवानो माझे एकच सांगणे आहे की आपण सोशल मीडियावर आपल्या जातीवर, व्यक्तीवर, अनुसूचित जातीमधील इतर घटकांवर टीका टिपणी किंवा अर्वाच्य भाषेत बोलून अपमान करणे, महापुरुषांबद्दल त्यांच्या विचारांवर टीका करणे या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजेत, कारण अशा टीका टिपणी करून किंवा विचार खोडून आपली मागणी पूर्ण होणार नाही कारण आपला जो आरक्षण विषयक जो लढा आहे तो यशस्वी करण्यासाठी मातंग समाजातील प्रगतशील शिकलेला उच्च पदावर असलेला वैचारिक चळवळ चालवणारा आणि इतर सामाजिक संघटना यांनी आपले विचार व्यक्त करणे गरजेचे आहे, हा लढा यशस्वी होण्यासाठी आपल्याच मातंग बांधवांना की जे विचारांपासून भरकटलेला आहे, अशिक्षित आहेत परंपरांना आवळून धरून बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत सामाजिक बांधिलकीचे विचार पोहोचवले पाहिजे जेणेकरून ते सुद्धा या अबकड आरक्षण चळवळीमध्ये सहभाग दर्शवतील यासाठी मी आणि माझ्या वैचारिक बांधवांनी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मातंग समाजाचे एकीकरण वैचारिक व्यासपीठ तयार केले आहे ते म्हणजे मातंग पर्व हे फेसबुक पेज यु ट्यूब आणि इंस्टग्राम च्या माध्यमातून आपल्या मातंग समाजाविषयीचे आपले विचार, चळवळी, आंदोलने, आरक्षण विषयी सकारात्मक विचार, समाजाचा इतिहास, व्यवसाय व योजना इत्यादी बाबतीतील व आपल्या चळवळीतील नेत्यांचे विचार की जे मातंग समाजाच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने नेता येतील व निश्चितच मातंग पर्व च्या माध्यमातून मातंग समाजाला एक प्रगतीची व विकासाची दिशा मिळेल तेव्हा सर्व बांधवांनी मातंग पर्व या फेसबुक पेजला फॉलो करा,लाईक करा 🙏🏻
🙏🏻जय मातंग🙏🏻
Post a Comment
0 Comments